देश

हरिद्वारमध्ये पुढील वर्षी रंगणार कुंभमेळा;साडेतीन महिन्यांऐवजी ४८ दिवस होणार

पीटीआय

हरिद्वार - उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे पुढील वर्षी साडेतीन महिन्यांऐवेजी ४८ दिवसांसाठी कुंभमेळा होईल, अशी माहिती राज्याचे नागरी विकास मंत्री मदन कौशिक यांनी दिली. यासंदर्भाती अधिसूचना राज्य सरकार १ जानेवारीऐवजी फेब्रुवारीत जारी करेल, असेही त्यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कौशिक कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीबद्दल माहिती देताना म्हणाले, की कुंभमेळ्यासाठी कोरोनाची साथ लक्षात घेऊन शाही स्नानासाठी मार्च-एप्रिलमध्ये सुविधा केली जाईल. भाविकांना कुंभमेळ्याच्या ४८ दिवसांत शाही स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेता येईल. कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणत्याही तयारीला सुरवात केली नसल्याबद्दल अखिल भारतीय आखाडा परिषदेने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कौशिक यांनी कुंभमेळ्याबद्दल ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पाळत ठेवण्याच्या यंत्रणेसाठी १७.३४ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ६.९४ कोटींचा पहिला हप्ता दिला जाईल. तात्पुरत्या कोविड केंद्रासाठी १५.४६ कोटी दिले जातील. पहिला हप्ता ६.१८ कोटी रुपयांचा असेल. 

कुंभमेळ्यासाठी निधी (कोटी रुपयांमध्ये) 
देखरेख यंत्रणा  - १७. ३४ 
तात्पुरते कोविड केअर सेंटर  - १५.४६ 

अनेक वर्षांपासून साडेतीन महिन्यांसाठी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा बदललेल्या परिस्थितीमुळे दीड महिन्यांसाइच कुंभमेळा होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत चयांनी कुंभमेळ्याच्या विविध प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे. 
मदन कौशिक, नागरी विकास मंत्री, उत्तराखंड. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आखाडा परिषदेचा कुंभमेळा भरविण्याचा निर्णय 
कुंभमेळ्यासाठी सरकारने सहकार्य न केल्यास स्वत: कुंभमेळा भरविण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेने घेतला. महा कुंभमेळ्यासंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, की आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना निवेदन पाठवले आहे. कुंभमेळ्यासाठी व्यवस्था करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कामाला सुरवात झाली नाही. आम्ही प्रशासनाच्या या दृष्टिकोनाबद्दल नाराज आहोत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT